केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, आठवलेंची वर्णी लागण्याची शक्यता
By admin | Published: July 4, 2016 08:45 AM2016-07-04T08:45:58+5:302016-07-04T11:45:48+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होणार असून सकाळी 11 वाजता नवीन मंत्री शपथ घेणार आहेत
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 04 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होणार असून सकाळी 11 वाजता नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या दहा मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी स्वतः सर्व मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुप्रिया पटेल, पुरुषोत्तम रुपला, अर्जून राम मेघवाल, पीपी चौधरी आणि रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून नाव निश्चित करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याची चर्चा आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्याला स्थान मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एखादा नवा चेहरा केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.