Maharashtra | कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:08 PM2022-04-18T13:08:41+5:302022-04-18T13:09:54+5:30

यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात कोकणात पाऊस होताना दिसून येत आहे...

chance of rain again in konkan south maharashtra summer rainy season | Maharashtra | कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Maharashtra | कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

googlenewsNext

पुणे : आंब्याचा मोसम असताना गेल्या दोन महिन्यांपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होत असताना आता पुन्हा कोकण, दक्षिण महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात कोकणात पाऊस होताना दिसून येत आहे.

विदर्भात सर्वत्र सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असून राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

गेल्या २४ तासात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली येथे पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. त्याचवेळी १९, २० आणि २१ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी २० व २१ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३९.२, लोहगाव ४०.३, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३२.१, नाशिक ३७.५, सांगली ३६.२, सातारा ३८.१, साेलापूर ४०.८, मुंबई ३३.४, सांताक्रूझ ३३.८, रत्नागिरी ३३.४, पणजी ३४, डहाणू ३४.५, औरंगाबाद ४०.४, परभणी ४१.९, अकोला ४३.६, अमरावती ४२.४, बुलढाणा ४१.२, ब्रम्हपुरी ४४.२, चंद्रपूर ४४.२, नागपूर ४२, वाशिम ४२, वर्धा ४३.

Web Title: chance of rain again in konkan south maharashtra summer rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.