राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:30 AM2021-02-17T03:30:35+5:302021-02-17T03:30:56+5:30
rain : किमान तापमानातही घट कायम असून, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड आणि नागपूर येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईसह राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत असून, पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून, किंचित ठिकाणी पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव जाणवत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ फेब्रुवारीला राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. परिणामी शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
किमान तापमानातही घट कायम असून, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड आणि नागपूर येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.
पुणे १४.९, महाबळेश्वर १५.२, नाशिक १६.१ तर, बारामतीत १५.७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाेंद झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास, तर किमान तापमान २० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.