कोरोनाच्या प्रकोपात राज्यावर आणखी एक संकट; 4 दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीटीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 09:56 PM2021-04-08T21:56:42+5:302021-04-08T21:56:57+5:30
IMD MUMBAI warning in Maharashtra: उत्तर भारत आणि मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत.
मुंबई : राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेचे संकट आलेले असताना आता आणखी अस्मानी संकट घोंघावू लागले आहे. येत्या 4-5 दिवसांत राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (heavy rain, storm in Maharashtra; imd wrning for newxt 4-5 days)
येत्या ४ ते ५ दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारत आणि मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातच्या कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास असले तरी गुरुवारी सकाळी आणि दुपारी शहर व उपनगरात ढगाळ वातावरण होते. राज्यात काही ठिकाणी दुपारपर्यंत ढगाळ हवामान होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला होता.