दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
By admin | Published: April 29, 2016 12:45 AM2016-04-29T00:45:33+5:302016-04-29T00:45:33+5:30
पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़
पुणे : विदर्भात तुरळक ठिकाणी गुरुवारी पाऊस झाला असून, पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर कोकण, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे ४४़५ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे सर्वांत कमी किमान तापमान २१़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़
पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी दिवस अधिक उष्ण राहण्याची व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ पुणे व मुंबई परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़
४राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअस) : पुणे ३९़८, लोहगाव ४०़३, अहमदनगर ४२़८, जळगाव ४३़२, कोल्हापूर ३९़६, महाबळेश्वर ३४़१, मालेगाव ४३़२, नाशिक ४०़२, सातारा ४१़४, सोलापूर ४२़९, मुंबई ३३, अलिबाग ३२़४, रत्नागिरी ३४़१, पणजी ३४़३, डहाणू ३५़४, औरंगाबाद ४१़२, परभणी ४२़४, नांदेड ४४़५, बीड ४३़१, अकोला ४३़६, अमरावती ४२़४, बुलढाणा ४०़६, ब्रह्मपुरी ४२़५, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ४०़२, नागपूर ४३़२, वाशिम ४०़२, वर्धा ४३़२, यवतमाळ ४२़