भंडा-यात क्लोरिन गळतीमुळे ८ मुली बेशुद्ध
By admin | Published: December 12, 2014 10:39 AM2014-12-12T10:39:23+5:302014-12-12T10:39:49+5:30
एनएसएसच्या कॅम्पदरम्यान पेपर मिलमध्ये प्रात्यक्षिकांसाठी गेलेल्या ८ विद्यार्थीनी क्लोरिन गळतीमुळे बेशुद्ध पडल्याची घडना भंडारा येथे घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
भंडारा, दि. १२ - एनएसएसच्या कॅम्पदरम्यान पेपर मिलमध्ये प्रात्यक्षिकांसाठी गेलेल्या ८ विद्यार्थीनी क्लोरिन गळतीमुळे बेशुद्ध पडल्याची घडना भंडारा येथे घडली आहे. या मुली करडी येथील वाणिज्य व कला महाविद्यालयात शिकत होत्या.
एनएसएसच्या कॅम्पसाठी ४५ विद्यार्थीनी आल्या होत्या. प्रात्यक्षिकांसाठी त्या एलोरा पेपर मिलमध्ये गेल्या होत्या, मात्र त्या मिलमधील बंद मशीनमधून क्लोरिन गळती झाली व काही विद्यार्थीनी बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर तुमसर येतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.