शेतक-यांनी पकडून दिले चंदन तस्कर
By Admin | Published: July 19, 2016 11:41 AM2016-07-19T11:41:36+5:302016-07-19T11:41:58+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर व वडगाव येथील शेतक-यांनी लातूर जिल्ह्यातील चार चंदन तस्करांना पकडून वळसंग पोलिसांच्या हवाली केले.
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि, १९ - दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर व वडगाव येथील शेतक-यांनी लातूर जिल्ह्यातील चार चंदन तस्करांना पकडून वळसंग पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार हजार रुपयांचे चंदन जप्त केले आहे.
याबाबत शेतकरी बसवराज घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अर्जुन लक्ष्मण गायकवाड (रा.नळेगाव, जि. लातूर), भैरु मंजुनाथ मोरे (रा.नळेगाव,जि. लातूर), पिंटू गायकवाड (रा. बोरगाव काळे, ता. लातूर), विष्णू धोंडिराम मोरे ((रा.नळेगाव, जि. लातूर) या चौघांविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघे दिंडूर व वडगाव शिवारात सोमवारी दुपारी चंदनाची झाडे चोरी करण्यासाठी आले होते. ही बाब लक्षात येताच तेथील शेतक-यांनी या चौघांना रंगेहात पकडले व तत्काळ पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ कुºहाड व चंदनाची लाकडे अशा वस्तू मिळाल्या आहेत. ही कारवाई सपोनि इंद्रजित सोनकांबळे, पी.एन. कोळी, स्वामीनाथ लोंढे, मुजावर आदींनी केली.