चांदोली धरण जवळपास १०० टक्के भरले; धरणातून  ३२५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:14 PM2021-09-08T21:14:30+5:302021-09-08T21:15:50+5:30

धरण प्रशासनाकडून देण्यात आला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

chandoli dam is almost 100 percent full discharge of water from dam starts at 3250 cusecs | चांदोली धरण जवळपास १०० टक्के भरले; धरणातून  ३२५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु 

चांदोली धरण जवळपास १०० टक्के भरले; धरणातून  ३२५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु 

Next

सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क
 
शित्तूर-वारूण:
पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात २६५२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले पाहिजे व पूर नियंत्रणही झाले पाहिजे या दृष्टीने धरण व्यवस्थापनाने दरवर्षीप्रमाणे पावसाचा अंदाज घेत केलेले योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण याहीवर्षी जवळपास १०० टक्के भरले आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.८० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज ९९.७२ टक्के भरले असून धरणात सध्या ९७१.४८२ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात ५० मी. मी. पाऊस पडला आहे. यामुळे धरणात ११२८९ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा विजगृहातून ३२५० क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. शाहुवाडी, शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धरण शंभर टक्के भरल्यामुळे लोकांची पाण्याची चिंता मिटली आहे.  

टि. एस. धामणकर - (शाखा अभियंता- वारणा पाटबंधारे, वारणावती) 

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवावा लागणार आहे. नदीकाठच्या गावांना दिलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे.
 

Web Title: chandoli dam is almost 100 percent full discharge of water from dam starts at 3250 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण