शिक्षेविरोधात चंद्रकांत गुडेवार न्यायालयात
By Admin | Published: April 17, 2017 02:34 AM2017-04-17T02:34:15+5:302017-04-17T02:34:15+5:30
अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
अमरावती : अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या ‘रीट पिटीशन’वर सोमवारी द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अमरावतीचे भाजपा आमदार सुनील देशमुख यांचा अवमान केल्याप्रकरणी गुडेवार यांना दोषी ठरवून न्यायासनासमोर बोलावून समज दिली जाईल, असा निर्णय ७ एप्रिलला विधानसभेत घेण्यात आला होता. त्या निर्णयाला पुणे विभागीय आयुक्तालयात कार्यरत चंद्रकांत गुडेवार यांनी न्यायालयात आव्हान दिले. महाराष्ट्र शासन, राज्य विधानसभेचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव व गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)