कोल्हापुरातील खगोल अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांचं निधन

By Admin | Published: October 30, 2016 04:53 PM2016-10-30T16:53:47+5:302016-10-30T16:53:47+5:30

कोल्हापुरातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व खगोल अभ्यासक चंद्रकांत मुरलीधर परुळेकर (वय ७२) यांचे गंगावेशमधील धोत्री गल्लीमधील निवासस्थानी शनिवारी रात्री पोटविकाराने निधन झाले

Chandrakant Parulekar dies in Kolhapur Astronomer | कोल्हापुरातील खगोल अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांचं निधन

कोल्हापुरातील खगोल अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांचं निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 30 -   कोल्हापुरातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व खगोल अभ्यासक चंद्रकांत मुरलीधर परुळेकर (वय ७२) यांचे गंगावेशमधील धोत्री गल्लीमधील निवासस्थानी शनिवारी रात्री पोटविकाराने निधन झाले. चंद्रकांत परुळेकर हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गचे. त्यांच्या पश्चात पत्नी शर्मिला, मुलगा पवन, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. ५० वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात राहत होते.
 
 खगोल अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांना पोटविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात तीन आठवड्यांपूर्वी उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांच्यावर पोटविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर गेल्या आठवड्यात त्यांना घरी आणण्यात आले. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री चंद्रकांत परुळेकर यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. २) पंचगंगा स्मशानभूमीत आहे. त्यांनी विशेषत: श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अडथळ्यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर पंचगंगा नदीघाटावरील दीपमाळांवर पडणाºया सूर्यकिरणांचा अभ्यास करून ‘झिरो शॅडो’ (शून्य सावली)चा शोध लावला. काही महिन्यांपूर्वी सहा तास २० मिनिटांत काचेच्या बाटलीत शिडी तयार करून ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड’चा किताब त्यांनी मिळविला.
 
 नवनवीन संशोधकीय उपक्रम राबविण्याचा वसा जपणारे चंद्रकांत परुळेकर हे कोल्हापूरच्या औद्योगिक विश्वाला लाभलेले एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे आजोबा दत्तात्रय महादेव परुळेकर यांनी कोल्हापुरात येऊन सन १९२३ ला प्रथम गंगावेश येथे वर्कशॉप उघडून प्रारंभ केला. वडील मुरलीधर जगभरातून कोल्हापुरात येणारी मशीन्स, पंप्स व उसाचे घाणे दुरुस्त करायचे. त्यांची संधी घेत व वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दहावीपर्यंत शिक्षण केलेले चंद्रकांत यांनी उद्योगधंद्यात प्रवेश केला. एकीकडे उद्योगधंदा करताना त्यांनी संशोधक, चिकीत्सक वृत्ती जोपासली. सध्या ते वाय. पी. पोवार औद्योगिक वसाहतीतील मे. चंद्रकांत इंजिनिअरिंग वर्क्स चालवत असत. खगोलशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय. ‘झिरो शॅडो’ (शून्य सावली), विजयदुर्गमधील रामेश्वर मंदिरातील किरणोत्सव हे त्यांच्या संशोधनाचे विषय. या उपक्रमातील बारकावे शास्त्रीयदृष्ट्या तपासून अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
 
 
विजयदुर्गमध्ये वस्तुसंग्रहालय उभारणार...
 
चंद्रकांत परुळेकर यांचा सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या या कार्याची चिरंतन आठवण राहावी यासाठी विजयदुर्ग येथे त्यांचे वस्तुसंग्रहालय उभारण्याचा मानस असल्याचे त्यांचा मुलगा पवन परुळेकर यांनी सांगितले.
 
 दरम्यान, माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे हे शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले असताना त्यांची चंद्रकांत परुळेकर यांची भेट झाली. त्यावेळी परुळेकर यांनी विजयदुर्ग येथे माझे वस्तुसंग्रहालय करावे अशी माझी शेवटची इच्छा असल्याचे त्यांना बोलून दाखविले होते, अशी माहिती लवटे यांनी ‘लोकमत’ला दिली.
 
 परुळेकर यांचा जीवनप्रवास...
 
* जन्म २३ मार्च १९४४ 
 
*  छंद : सहा हजार जुनी नाणी संग्रह 
 
* बाटलीमध्ये : कॉट, खुर्ची, मेणाचा पुतळा, पेंटिंग, एक रुपयाचे नाणे
 
* लाकडी अखंड साखळी (विना जोड)
 
* दिशासाधन मंदिराचा अभ्यास व संशोधन 
 
* भवानी मंडपावरील जुने टॉवर क्लॉक दुरुस्त केले (स्वखर्चाने), 
 
*  पंचगंगा घाटाची स्वच्छता,
 
* शंभर शाळा व कॉलेजमधून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व शोभीवंत वस्तू निर्माण करण्याची कार्यशाळा,   
 
* विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) किल्ल्यावरून १९६८ मध्ये झालेल्या हेलिमय शोधाची जागृती केली
 
 * पी.व्ही.एस. पाईप वापरून हेलिस्कोप (आकाशदर्शन) पाहणे, 
 
* दोन राष्ट्रपती, चार पंतप्रधान, सहा मुख्यमंत्री, लता मंगेशकर या मान्यवरांसह सात हजार लोकांना बाटलीतील शिडी भेट म्हणून दिली. 
 
* भिंतीवरील घड्याळे (जुनी) मोफत दुरुस्त करणे
 
* वृत्तपत्रांमधून लेख व राष्ट्रीय चॅनेलवर मुलाखती दिल्या
 
* कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर भूषण आदी पुरस्कार
 
 
 
                                                 

Web Title: Chandrakant Parulekar dies in Kolhapur Astronomer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.