'अनिल देशमुखांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी हार घालून स्वागत करायचं का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:11 PM2021-09-02T15:11:20+5:302021-09-02T15:19:18+5:30
Chandrakant Patil slams Anil Deshmukh: 'अनिल देशमुखांची संपत्ती उगाच जप्त होत नाहीये.'
अमरावती: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अनिल देशमुखांनी दरोडा घालयचा आणि पोलिसांनी त्यांना अटक करायची नाही, तर काय हार घालयचा का?' अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. चंद्रकांत पाटील आजपासून दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत.
https://t.co/Cw4QzE0g58 'आधी मोदींच्या नावाने मतं मागायची आणि जिंकून आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं.'#UddhavThackeray#chandrakantpatil
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, 'राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यांना क्लिन चिट मिळाली, अशा चर्चा सुरू आहेत. पण, सध्या त्याची चौकशी होत आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी अटक करायची नाही, तर काय हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असं म्हणायचं का?' अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच, सीबीआयने काय करावं हा माझा विषय नाही. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होतीये, ती उगाच होत नाहीये,' असही पाटील म्हणाले.
भाजपाचा स्वबळाचा नारा...
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवरही टीका केली. तसेच, आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळाचा मार्ग असल्याचही म्हणाले. 'सध्या भाजपाचा प्रवास स्वबळाचा आहे. आम्हाला आता कुणाकडूनही फसवलं जायचं नाहीये. आम्ही एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. ही शिवसेना कुठं होती? मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा विदर्भात आणलं आणि आता 56 वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि 105 वाल्याला टाटा, बाय-बाय केलं. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचं नाही', असं ते म्हणाले.