शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरतीये, चंद्रकांत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 05:04 PM2021-08-31T17:04:45+5:302021-08-31T17:05:41+5:30
Chandrakant Patil criticizes Anil Parab:'सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते, मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं.'
नागपूर: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणं गरजेचं होतं. ईडीकडून त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. पण, अनिल परब ईडी कार्यालयात पोहोचायलेच नाहीत. त्यांनी ईडीकडे 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्यावर टीका केलीये.
भाजप नेते राम कदम यांनी इशारा दिला की, ठाकरे सरकार जर पोलीस बळाचा गैरवापर करत असेल, तर...#DahiHandi#BJP#uddhavThackerayhttps://t.co/lZpXPRZQAS
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते, मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. तिकडं अनिल देशमुखांचंही असंच सुरू आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे, काही जण सुपात आहेत तर काही जण जात्यात, असा टोला त्यांनी लगावला.
https://t.co/H9wLnn61W8
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
'दारू आणि मांस विकणाऱ्यांनी यापुढे दुध विकावं...'
अनिल परबांनी ईडीकडे 14 दिवसांचा वेळ मागितला
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतू अनिल परब यांनी ईडीकडे (ED) 14 दिवसांची वेळ मागितली आहे. यासाठी त्यांनी मंत्री असल्याने काही ठरलेली कामे आहेत, यामुळे हजर राहू शकत नाही असे कळविले आहे.