चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती - अजित पवार
By admin | Published: February 16, 2016 08:20 PM2016-02-16T20:20:35+5:302016-02-16T20:20:35+5:30
दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित
Next
>- अधिवेशनात विरोधी पक्ष मिळून सरकारला जाब विचारू
तासगाव : दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तोफ डागली.
हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करुन नऊ मार्चपासून सुरू होणा:या अधिवेशनात विरोधी पक्षातील सर्व सहकारी मिळून दुष्काळासह विविध प्रश्नांना वाचा फोडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीसाठी अजित पवार अंजनी (ता. तासगाव) येथे आले होते. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर टीकची झोड उठवली.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजना पाच कोटींच्या निधीसाठी ठप्प आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केल्यानंतर, त्यांनी सरकारकडे नोटा छापायचे मशीन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की, सत्तेची मस्ती आल्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत आहेत. जनता अशी मस्ती कधीही उतरवू शकते. जनतेला पाणी द्यायला हवे. शासनाने अडवणुकीचे धोरण राबवून चालणार नाही.
अडचणीत असणा:या जनतेला सावरण्याकरता सरकारने धाडसाचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने निर्णय घेत नाही. विदर्भ, मराठवाडय़ात भीषण दुष्काळ आहे. जनावरांच्या चा:याचा यक्षप्रश्न आहे, तरीदेखील छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे हे सरकार कोणाचा आणि कसा विचार करत आहे, याचे तारतम्य राहिलेले नाही. लोकहिताच्या योजना बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र अशा योजना प्रभावीपणो राबविणो आवश्यक आहे, हे शासनाकडून होत नाही, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आगीच्या घटनेची चौकशी व्हावी...
मंत्रलयात आग लागली तेव्हा ही आग आम्हीच लावली, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून होत होता. आता भाजप सरकारच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्टेजला आग लागली. मात्र ही आग त्यांनीच लावली, असा आरोप आम्ही करणार नाही. अशा घटना काही त्रुटींमुळे होत असतात. त्याची चौकशी व्हायला हवी.
- अजित पवार