Chandrakant Patil Exclusive : जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंतच्या यशामागे आहे चंद्रकांत पाटलांचा हात, पाहा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:01 PM2021-10-30T15:01:19+5:302021-10-30T15:01:42+5:30
लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सांगितला किस्सा.
जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंतला तिच्या खेळात चंद्रकांत पाटील यांनी केलंय मोलाचं सहकार्य.
जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंत हीच्या यशामागे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचादेखील मोलाचा वाटा आहे. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हा किस्सा उलगडला.
"२००४ मध्ये तेजस्विनी सावंत हीनं नेमबाजीला सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू तिलाही काही मेडल्सही मिळू लागली. त्यानंतर तेजस्विनीनं, तिच्या आई-वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला. आपल्याला जर काही मदत मिळाली तर आणखी पुढे जाता येईल, असं तिनं सांगितलं. त्यावेळीही एक गन घ्यायची म्हटलं तर त्याची किंमत पावणे दोन लाख रूपये होती. सध्या त्या गनची किंमत ८ लाख रूपये आहे. मी माझ्या परीनं मदत करत गेलो आणि तिनंही त्याचं सोनं केलं," असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी तिचं कौतुक केलं.
"२००६ मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या स्पर्धेत तिला दोन सुवर्ण पदकं मिळाली. तिच्या कामगिरीचं कौतुक म्हणून सरकारनं तिला दोन कोटी रूपयेही दिले आणि कोल्हापूरात प्लॉटही दिला. त्यानंतर तिचं जीवनच बदललं. अजित पवारांनीही तिची कोल्हापूरात भेट घेतली, त्यानंतर तिला राज्यातला पहिला विथआऊट एमपीएससी क्लास १ नोकरीही मिळाली," असं ते म्हणाले. अजून एक मोठं नाव आहे ते इतकं जोडलं गेलं की तिचं कन्यादानही मी केलं. सकाळी गुड मॉर्निग बाबापासून रात्री गुड नाईट बाबा असाही रोज मेसेज असतो असंही त्यांनी नमूद केलं.