कार्तिकीची महापूजा चंद्रकांत पाटील करणार
By Admin | Published: November 10, 2016 05:40 AM2016-11-10T05:40:38+5:302016-11-10T05:40:38+5:30
नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे यंदा कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याबाबत संभ्रमावस्था होती़
पंढरपूर : नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे यंदा कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याबाबत संभ्रमावस्था होती़ मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महापूजा होईल, असे शासनाने जाहीर केले असून त्यांचा शासकीय दौराही जाहीर झाला आहे.
महसूलमंत्री पाटील १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४़३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे येतील. ११ रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे २़३० वाजता खासगी वाहनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण करतील़ पहाटे ३ वाजता त्यांच्या हस्ते शासकीय महापूजेस प्रारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)