महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 05:39 PM2018-06-24T17:39:42+5:302018-06-24T17:40:17+5:30

फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली़.

Chandrakant Patil News | महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Next

परभणी-  रेल्वेच्या फाटक परिसरात अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे़. फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित भूमीपूजन सोहळ्यात ग्रामस्थांना दिली़. 

सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत कार्यालय वझूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जून रोजी सकाळी ११ वाजता पिंगळी-लिमला-वझूर- रावराजूर-मरडसगाव प्ऱजि़मा़ ३५ वर पूर्णा तालुक्यातील वझूर गावजवळ गोदावरी नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन २कण्यात आले़ या पुलाचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी भूमीपूजन करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ़ मोहन फड, अ‍ॅड़ गंगाधरराव पवार, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आबासाहेब पवार, बबनराव पवार, माधव दुधाटे, मुंजाभाऊ शिंदे, अ‍ॅड़ अशोकराव शिंदे यांची उपस्थिती होती़ पुढे बोलताना बांधकाम मंत्री पाटील म्हणाले, शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाजारपेठेत आणण्यासाठी रस्ते व पुलांची नितांत आवश्यकता असते़ आघाडी शासनाने याकडे दुर्लक्ष करीत शेतकºयांना वाºयावर सोडले होते़ मात्र हे सरकार छत्रपती व शाहूंच्या विचारांचे सरकार आहे़ या शासनाकडून शेतकºयांना मागणी करण्याआधीच त्यांचे प्रश्न सोडविल्याचे काम केले जात आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यातील १६ हजार गावे पाणीदार करण्यात आली आहेत़ त्यामुळे येत्या काळात शेतकºयांचे सर्व प्रश्न सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले़  या कार्यक्रम पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दादा पवार, सुभाष कदम, आ़ डॉ़ मधुसूदन केंदे्र आदींनी मनोगत व्यक्त केले़ रमेश गोळेगावकर यांनी प्रास्ताविक केले़ या कार्यक्रमास वझूर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी सरपंच लक्ष्मण लांडे, व्यंकटी काळे, इंजि़ अतुल चव्हाण, इंजि़ संतोष शेलार आदींनी प्रयत्न केले़ 

भाजप सरकार शेतकºयांच्या हिताचे- रावसाहेब दानवे

राज्यामध्ये ब्रिटीशकालीन कायद्यानुसार आघाडी सरकारने शेतकºयांना पीक विमा, आणेवारी संदर्भात निर्णय घेऊन तुटपुंजी मदत केली़ मात्र भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पीक विमा, आणेवारी या पद्धतीत बदल करून  शेतकºयांना न्याय देण्याचे काम केले आहे़ स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच पीक विम्याच्या माध्यमातून राज्य शासनाने परभणी जिल्ह्यासाठी भरभरून मदत केली आहे़ या आधीच्या सरकारच्या काळात शेतकºयांना खरीप व रबी हंगामाच्या तोंडावर बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत होते़ काही ठिकाणी तर गोळीबारही करण्यात आला होता़ मात्र भाजप सरकारने शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेऊन मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध करून दिला आहे़ त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकºयांना खते खरेदी करण्यासाठी रांगा लावण्याची गरज नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांनी सांगितले़ 

पीक विम्यापोटी जिल्ह्याला १०६ कोटी रुपये- लोणीकर

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीे परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत़ येत्या आठ दिवसांत पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकºयांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येतील़ परभणी जिल्ह्यात अनेक खासदार व आमदार होवून गेले आहेत़ मात्र जिल्ह्याच्या मुलभूत प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले़ मागील ३० वर्षांपासून जिल्ह्यातील रस्ते व पुलांचा प्रश्न ऐरणीवर आहे़ मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत केवळ राजकारण केले आहे़ मात्र भाजप सरकारने जिल्ह्यात सत्ता नसूनही जिल्ह्यातील रस्त्यांचे व पुलांचे प्रश्न मार्गी लावले आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले़ ​

Web Title: Chandrakant Patil News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.