Coronavirus in Maharashtra : चंद्रकांत पाटील यांचे काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:31 PM2020-05-22T12:31:11+5:302020-05-22T12:36:12+5:30

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून आंदोलन केले.

Chandrakant patil protests with wearing black mask for Maharashtra bachao andolan | Coronavirus in Maharashtra : चंद्रकांत पाटील यांचे काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचे निवासस्थानासमोर आंदोलनहातावर पोट असणाऱ्यांसाठी ५० हजार कोटींची मागणी

कोल्हापूर :  कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.

हातावर पोट असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ५० हजार कोटी रूपयांच्या पॅकेजची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अंजली, मातोश्री सरस्वती बच्चू पाटील, सासुबाई शुभदा खरे, मोहन मेने आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपच्या शहर कार्यालयातून हे आंदोलन केले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

Web Title: Chandrakant patil protests with wearing black mask for Maharashtra bachao andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.