'तुम्हाला मंदी कळते का'? ; चंद्रकांत पाटलांचा थोरातांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:20 PM2020-02-12T12:20:46+5:302020-02-12T12:26:24+5:30
जगातील मंदी उठली आणि आपल्या देशात आली, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केला होता.
मुंबई : जगातील मंदी उठली आणि आपल्या देशात आली, असा आरोप महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केला होता. थोरात यांनी केलेल्या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.'बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का' ? असे म्हणत त्यांनी थोरातांवर निशाणा साधला.
मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत जगात मंदी आली असतानाही त्याच्या झळा भारताला बसल्या नाहीत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नेमकी उलट स्थिती झाली आहे. जगातील मंदी उठली आणि आपल्या देशात आली, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केला होता.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, बाळासाहेब थोरतांना मंदी कळते का? मंदी एका देशांतून दुसऱ्या देशात येत नाही, ती जगात असते, त्यामुळे बाळासाहेब थोरतांनी मंदी काय असते ते आधी नीट समजून घ्यावी, असं म्हणत त्यांनी आपल्या शैलीत थोरात यांना उत्तर दिलं. तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे.