ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये: चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:42 AM2021-02-23T10:42:52+5:302021-02-23T10:45:24+5:30
महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil slams thackeray govt over GST issues)
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीची थकबाकी आलेली नाही. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये. प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकार फोडू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील २८ राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जीएसटी परताव्याची रक्कम देण्यात आली आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
राज्याचा विकास गतिमान करावा
केंद्राकडून आलेली जीएसटीची रक्कम महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना आणि राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी. जीएसटीच्या थकबाकीचे कारण आता पुढे करू नये, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.