Chandrakant Patil: "काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले"; चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 02:35 PM2022-03-27T14:35:38+5:302022-03-27T14:35:47+5:30

Chandrakant Patil: ''मी सामना वाचणे आणि संजय राऊतांवर बोलणे बंद केले आहे. कधी आम्ही वर होतो आज दुसरे कुणी आहे, उद्या आम्ही परत वर येऊ.''

Chandrakant Patil | Yashwant Jadhav |Sanjay Raut | BJP state president Chandrakant Patil slams Sanjay Raut and demands inquiry into Yashwant Jadhav's diary | Chandrakant Patil: "काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले"; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil: "काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले"; चंद्रकांत पाटलांचा टोला

Next

मुंबई: यशवंत जाधव(Yashwant Jadhav) यांच्या कथित डायरीने राजकारणात नवीन ट्विस्ट आला आहे. डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांनीही (Chandrakant Patil) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''अशाप्रकारची डायरी असेल, तर चौकशी व्हायला हवी'', अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

संजय राऊतांना टोला
मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एका कथित डायरीविषयी माहिती समोर आली आहे. त्याबाबत केंद्रीय यंत्रणा आपले काम करत आहे. काहीतरी होणार असल्याचा संशय येतोय, खरचं अशाप्रकारची डायरी असेल, तर चौकशी व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, ''मी सामना वाचणे आणि राऊतांवर बोलणे बंद केले आहे. कालचक्र फिरत असते, कधी आम्ही वर होतो आज दुसरे कुणी आहे, उद्या आम्ही परत वर येऊ,'' असे सूचक विधान त्यांनी केले. 

'काहीजण सुपात, तर...'
ते पुढे म्हणाले की, ''संजय राऊतांकडून माझी चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते एक ना एक गोष्ट खरी ठरत आहे. सध्या काहीजण सुपात आहेत, काहीजण जात्यात आहेत, तर काही जणांचे पीठही झाले'', असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांबाबत अजित पवरांना पत्र लिहील्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नेमके काय प्रकरण आहे ?
माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत मुंबई महापालिकेला लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या काळात त्यांनी 38 मालमत्ता खरेदी केल्या असून, 2018 ते 2022 दरम्यानच्या दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख डायरीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे.
 

Web Title: Chandrakant Patil | Yashwant Jadhav |Sanjay Raut | BJP state president Chandrakant Patil slams Sanjay Raut and demands inquiry into Yashwant Jadhav's diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.