एशियाटीक लायब्ररीच्या दुरूस्तीचे काम करणा-या कंत्राटदारांची चौकशी करणार, चंद्रकात पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 03:57 PM2017-12-15T15:57:26+5:302017-12-15T15:57:46+5:30
ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीच्या छताचे दुस्तीचे काम पाच वर्षांपुर्वी करण्यात आले त्यानंतरही यावर्षी पुन्हा पावसाचे पाण्याची गळती झाली त्यामुळे हे काम करणा-या कंत्राटदारांची व संबधित अधिका-यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केली.
नागपूर : ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीच्या छताचे दुस्तीचे काम पाच वर्षांपुर्वी करण्यात आले त्यानंतरही यावर्षी पुन्हा पावसाचे पाण्याची गळती झाली त्यामुळे हे काम करणा-या कंत्राटदारांची व संबधित अधिका-यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केली. मुंबईतील एशियाटीक लायब्ररीमध्ये यावषीच्या पावसाळयात गळती होऊन पाणी घुसले व पुस्तकांचे नुकसान झाले. या लायब्ररीमध्ये अनेक दुर्मिळ व अनेक मौलिक ग्रंथ या लायब्ररीमध्ये आहेत. असे असतानाही या वास्तुच्या कामाकडे वेळीच लक्ष देण्यात आले नाही व त्यामध्ये हलगर्जीपणा झाल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अतुल भातकळकर यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले की, या वास्तुच्या दुरूस्तीचे काम पाच वर्षापुर्वी करण्यात आले होते. त्यानंर पुन्हा यावर्षी पाण्याची गळती झाली त्यामुळे पुन्हा काम तातडीने करण्यात येईल तसचे पाय-यांच्या दुरूस्तीचे कामही सुरू असून ते लवकर पुर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले की, एशियाटीक लायब्ररीची वास्तू इंग्रज काळात बांधण्यात आली असून या वास्तूची पहिल्या पायरीच्या उंची एवढी शहरातील बांधकामांची उंची राहिल्यास शहरातील घरांना पुराचा फटका बसणार नाही अशा प्रकारची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे या वास्तुचे ऐतिहासिक महत्व तर आहेच शिवाय अत्यंत दुर्मिळ ग्रंथसंपदाही आहे. असे असतना या वास्तुची काळजी संबधित अधिका-यांनी घेतली नाही. पुराचे पाणी घुसत नाही म्हणून वरून पाण्याची गळती करण्यात आली की काय, असा संतप्त उपरोधीक सवालही त्यांनी करीत पाच वर्षांपुर्वी केल्या कामाची चौकशी करण्याची मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. दरम्यान, दोन्ही कडील सदस्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाच वर्षापुर्वी काम करणा-या कंत्राटदार व संबंधित अधिकार-यांची चौकशी करण्यात येईल, असे मंत्र्यांची सांगितले.