‘चंद्रकांत पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही, त्यांनी येत्या विधानसभेला उभे राहावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:37 AM2017-10-09T02:37:31+5:302017-10-09T02:39:04+5:30

महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील एक मतदारसंघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे,

Chandrakant Patil's arbitrariness will not be tolerated further, he should stand in the next Vidhan Sabha. | ‘चंद्रकांत पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही, त्यांनी येत्या विधानसभेला उभे राहावे’

‘चंद्रकांत पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही, त्यांनी येत्या विधानसभेला उभे राहावे’

Next

कोल्हापूर : महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील एक मतदारसंघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्या वेळी शिवसेना त्यांना ताकद दाखवेल, असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी रविवारी येथे दिले.
कोल्हापूर येथे सेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा पार पडला. या वेळी कीर्तिकर बोलत होते. शिवसेनेच्या पाठबळामुळेच राज्यात भाजपाचे सरकार असून, त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील हे राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

Web Title: Chandrakant Patil's arbitrariness will not be tolerated further, he should stand in the next Vidhan Sabha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.