भाजपचे नुकसान होईल असे 'नाथाभाऊ' कधीही वागणार नाही; चंद्रकांत पाटलांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:05 PM2020-10-20T15:05:35+5:302020-10-20T20:07:12+5:30
भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत..
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काहीजणांकडून तर त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित केला गेला असून मुहूर्त देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही अनेक दिवसांपासून खडसे यांनी शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेते मंडळींच्या भेटीगाठी आहे. पण याही परिस्थितीत भाजपच्या नेत्यांना एकनाथ खडसे हे पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे.
खडसेंप्रती असा विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाले, भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या चर्चेवर भाष्य केले. खडसेंप्रती विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाले, भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. तसेच खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील.
मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौर्यावर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावत प्रवास करून केलेला पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा उपयोगावाचा नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये.ते मुख्यमंत्री आहेत, निर्णय घेऊ शकतात. त्यानी तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नाही असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावर टीका केली.
'' बाबा, मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड... ''
महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे. त्यांना प्रोटेक्त करावं लागते, याचे वाईट वाटते हे ते मनापासून करत असतील असे वाटत नाही. सरकार एकत्र चालवायचं म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत आहेत..बाबा, मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड असं पवारांना वाटत असेल.
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं..
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागायची असते. त्यामुळे राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी. केंद्राकडून जे मिळेल ते बोनस समजायचं...