चंद्रकांत पाटील यांनी संपत्ती,गुन्हे लपवले; न्यायालयाचे चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:47 PM2020-08-22T12:47:27+5:302020-08-22T12:59:35+5:30

विधानसभा निवडणुकीवेळी माहिती लपवल्याची तक्रार दाखल

Chandrakant Patil's hidden information about property and crimes; court orders inquiry | चंद्रकांत पाटील यांनी संपत्ती,गुन्हे लपवले; न्यायालयाचे चौकशीचे आदेश

चंद्रकांत पाटील यांनी संपत्ती,गुन्हे लपवले; न्यायालयाचे चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देमाझ्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार राजकीय सूडबुद्धीने; चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण१६ सप्टेंबरपर्यत त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणेन्यायालयाने  चांगलाच दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकांवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना संपत्ती आणि दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी दिले आहेत. चौकशी झाल्यानंतर १६ सप्टेंबरपर्यत त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
   चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.  निवडणुक लढण्यापूर्वी  संपत्ती आणि स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. मात्र या प्रतिज्ञापत्रात त्यांनी जाणूनबुजून ते मालक असलेल्या दोन कंपन्यांची माहिती 
लपविली असल्याचा  आरोप करीत कोथरूड येथील व्यवसायिक डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.  तसेच त्यांनी २०१६ ते २०१९दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.   २०१२ साली कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर झालेले असताना ते अद्याप सादर झालेले नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात दिली असल्याची तक्रार डॉ. हरिदास यांनी न्यायालयात केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला चालून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.तक्रारीची दखल घेत पोलिसांनी याबाबत चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 तक्रार राजकीय सूडबुद्धीने

न्यायालयात माझ्या विरुद्ध तक्रार केल्याचे मला बातम्यांमधूनच कळले असून ,माझ्याकडे अजून न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत आलेली नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही. ही तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे त्यामुळे ती तथ्यहीन आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.निवडणूक अर्ज भरताना मी सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे. तरी देखील कोणाला आक्षेप असल्यास उच्च न्यायालयात तो निवडणूक याचिका दाखल करू शकतो.

Web Title: Chandrakant Patil's hidden information about property and crimes; court orders inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.