इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 03:40 PM2023-07-24T15:40:19+5:302023-07-24T15:41:34+5:30

उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले होते.

Chandrakant Patil's initiative for Irshalwadi; 11 lakh aid check handed over to the Chief Minister | इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द

इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द

googlenewsNext

मुंबई - गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडुन देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारावर होणारा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण 11 लाखांचे धनादेश सुपूर्द केले आहेत. यामध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.

संवेदना सोशल फाऊंडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊंडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊंडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडुन प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडुन प्रत्येकी एक लाख असे एकूण रुपये 11 लाखांचे धनादेश  मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहेत.

Web Title: Chandrakant Patil's initiative for Irshalwadi; 11 lakh aid check handed over to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.