चंद्रपूर, लातूर, परभणी मनपा निवडणूक १९ एप्रिलला!

By Admin | Published: March 23, 2017 03:23 AM2017-03-23T03:23:27+5:302017-03-23T03:23:27+5:30

चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल.

Chandrapur, Latur, Parbhani Municipal elections on April 19! | चंद्रपूर, लातूर, परभणी मनपा निवडणूक १९ एप्रिलला!

चंद्रपूर, लातूर, परभणी मनपा निवडणूक १९ एप्रिलला!

googlenewsNext

मुंबई : चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल.
या महापालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज रविवार, २ एप्रिललादेखील स्वीकारण्यात येतील. २८ मार्च रोजी गुढीपाडव्याची सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र .२२ ब, जळगाव महापालिकेतील प्रभाग क्र .२४ अ आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेतील प्रभाग ४६ च्या रिक्तपदासाठीदेखील १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या शिवाय, धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणिअकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील १९ एप्रिललाच मतदान होईल.
ईव्हीएमच्या वापराबाबत...
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करून राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले की, या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्र ारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेलचा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिले आहेत. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. या यंत्रांची व निधीची उपलब्धता इत्यादींबाबत सर्वंकष विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच चंद्रपूर, लातूर व परभणी महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा वापर करणे शक्य होणार नाही, असे सहरिया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना पत्र परिषदेत स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Chandrapur, Latur, Parbhani Municipal elections on April 19!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.