चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक

By admin | Published: March 7, 2017 04:28 AM2017-03-07T04:28:26+5:302017-03-07T04:28:26+5:30

कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने बुधवारी जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला

Chandrapur Zilla Parishad adopts malnutrition | चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक

चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक

Next

मिलिंद कीर्ती,
चंद्रपूर- कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने बुधवारी जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात प्रथमच अशी योजना राबविण्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कुपोषित बालकांच्या घरी वारंवार भेटी देऊन आहार व आरोग्यबाबत कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबाच्या सोयीनुसार बालकांच्या वजनवाढीसाठी नियोजन करून दिले जाईल. संबंधित गावातील अंगणवाडीसेविकेवर समुपदेशनाची जबाबदारी न सोपविता पाच किमीच्या आतील अंगणवाडी केंद्रातील एक सेविका घेऊन त्यांचे पथक तयार करण्यात येत आहे.
>चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ही दत्तक योजना तयार केली आहे. अशा प्रकारची योजना ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर राज्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे जिल्हा कुपोषणमुक्त होण्यास मदत होईल.
- संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

Web Title: Chandrapur Zilla Parishad adopts malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.