Maharashtra Politics: “शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत, ते सांगतायत ते...”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:53 PM2023-03-04T16:53:36+5:302023-03-04T16:54:34+5:30

Maharashtra News: कसब्यावरून शरद पवारांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

chandrashekhar bawankule replied ncp chief sharad pawar over election result criticism | Maharashtra Politics: “शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत, ते सांगतायत ते...”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

Maharashtra Politics: “शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत, ते सांगतायत ते...”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

googlenewsNext

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला केवळ चिंचवड राखता आले. गेल्या ३० वर्षांपासून भाजपकडे असलेला गड महाविकास आघाडीने जिंकला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात अद्यापही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला आहे. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपला जास्तीची मते मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजप मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मते मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. 

शरद पवारांनी निकाल बघून घ्यावेत

चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकली. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मते भरून काढणे ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकले असेल तर ते दुरुस्त करू, असे सांगत शरद पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झाली. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

दरम्यान, अश्विनी जगताप यांचा विजय भाजपचा विजय नाही तर मग इकडे महाविकास आघाडी आहे का? इकडे धंगेकरांचा विजय आहे. खरेतर कसब्यात सुप्त सहानुभूतीची लाट धंगेकरांच्या बाजूने होती. तिथे भाजपा-काँग्रेस लढाईच झाली नाही. तिथे उमेदवारांमध्ये लढाई झाली. त्यात आमचा उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढला, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chandrashekhar bawankule replied ncp chief sharad pawar over election result criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.