गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी चंद्रशेखर दैठणकर
By admin | Published: July 29, 2016 01:20 AM2016-07-29T01:20:25+5:302016-07-29T01:20:25+5:30
पोलीस दलात वरिष्ठ दर्जाची पदे रिक्त असताना राज्य सरकारने दोन अप्पर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या. चंद्रशेखर दैठणकर यांची पुण्यातील
मुंबई : पोलीस दलात वरिष्ठ दर्जाची पदे रिक्त असताना राज्य सरकारने दोन अप्पर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या. चंद्रशेखर दैठणकर यांची पुण्यातील राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर पुणे आयुक्तालयातील गुन्हे विभागातील अप्पर आयुक्त सी.एच.वाकडे यांची तुरुंग विभागाच्या महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. गृह विभागाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून अप्पर महासंचालक दर्जाची (कायदा व सुव्यवस्था) व आस्थापना विभागाची पदे रिक्त आहेत. पहिल्यादा त्यांची नागपूर शहरात बदली करण्यात आली होती. मात्र तेथे ते हजर झालेले
नव्हते. (प्रतिनिधी)