चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

By admin | Published: March 26, 2017 03:01 AM2017-03-26T03:01:29+5:302017-03-26T03:01:29+5:30

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यास भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान होते.

Chandu Chavan was taken out of the death trap | चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

Next

जळगाव : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यास भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान होते. चंदूला मायदेशी आणण्याचा शब्द मी खान्देशवासीयांना दिला होता. पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा केला व आंतरराष्ट्रीय दबाव आणला आणि चंदूला मृत्यूच्या दाढेतून भारतात आणण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी शनिवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. चंदू आमच्या ताब्यात नाही, असे सुरुवातीला सांगणाऱ्या पाकिस्तानने नंतर तो तो ताब्यात असल्याची कबुली दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या सहकार्याने तसेच आंतरराष्ट्रीय दबाव आणून चंदूला अखेर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यशस्वी झालो.
पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखालील कार्यकाळात संरक्षण विभागासह अन्य कोणत्याही खात्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला नाही. मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले नाही. आॅगस्टा वेस्टलँडसह अन्य एक घोटाळा बाहेर आला मात्र तो मागील सरकारच्या काळातील होता. मोदी सरकारच्या काळाशी त्याचा अजिबात संबंध नाही. केंद्र सरकारची हीच मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.
निर्यातदार बनायचे आहे
संरक्षण विभाग आतापर्यंत अनेक साहित्य हे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आदी देशांकडून आयात करीत होता. आता मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील कारखान्यांत युद्ध साहित्य बनविण्यावर भर दिला जात आहे. आपल्याला निर्यातदार देश बनायचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
चंदू चव्हाणचे जन्मभूमीत जोरदार स्वागत
जवान चंदू चव्हाण हा सुटकेनंतर प्रथमच शनिवारी सामनेर (ता. पाचोरा) या जन्मगावी आला. त्याचा व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. चंदू चव्हाणचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अनपेक्षित जबाबदारी
मी व्यवसायाने डॉक्टर असल्याने माझ्यावर आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र संरक्षण खाते मिळाले. संसदेत ३९ डॉक्टर असून त्यापैकी एकाकडेही आरोग्य विभागाची जबाबदारी नाही तसेच संसदेत सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेले चार खासदार आहेत. त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी न सोपविता ती माझ्याकडे आहे. संरक्षण विभागात खूप शिकायला मिळाले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. पक्ष जो आदेश देईल, ती जबाबदारी मी पार पाडत आहे व भविष्यातही ती पार पाडणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Chandu Chavan was taken out of the death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.