चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच करेल सुटका - सुभाष भामरे
By admin | Published: January 12, 2017 09:47 AM2017-01-12T09:47:10+5:302017-01-12T11:11:21+5:30
नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.
कसे पोहोचले चंदू चव्हाण पाकिस्तानात?
28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली.
यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली होती. यानंतर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.
We are trying at the level of DGMO, so far the DGMO has spoken to the counterpart minimum 15-20 times: MoS Defence on Chandu Chavan pic.twitter.com/iPxmGFaU4H
— ANI (@ANI_news) 12 January 2017
The last time, which is two days back, when he spoke to Pak DGMO, they said enquiry is getting over and will soon release Chandu:MoS Defence
— ANI (@ANI_news) 12 January 2017
They admitted he (Chandu Chavan crossed LoC inadvertently) is alive, & they will soon release him after enquiry: MoS Defence Subhash Bhamre
— ANI (@ANI_news) 12 January 2017