एसटीच्या ताफ्यात ‘परिवर्तन’

By admin | Published: May 11, 2017 10:43 PM2017-05-11T22:43:35+5:302017-05-11T22:43:35+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला

'Change' in ST camp | एसटीच्या ताफ्यात ‘परिवर्तन’

एसटीच्या ताफ्यात ‘परिवर्तन’

Next

ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 11 - ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस आहेत. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत स्टीलच्या बांधणीत तयार झालेली बस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहे.

‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाणार आहे. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्यातरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत सहन करावी लागते. परिणामी, पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आलेल्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत. पारंपरिक बसच्या तुलनेत नवीन परिवर्तन बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी बदल करण्यात आले आहेत.

या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, या ठिकाणी बसवण्यात आले आहे, अशी परिवर्तन बस असणार आहे. 

Web Title: 'Change' in ST camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.