मतदार यादीत बदल झाल्याने नगरसेवकाचे झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 05:03 PM2016-10-25T17:03:11+5:302016-10-25T17:03:11+5:30
मुख्याधिका-यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी मंगळवारी नगरसेवक नंदू पवार यांनी फलटण पालिकेत झोपून आंदोलन केले.
Next
>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 25- फलटण पालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमधून कोणाचीही लेखी तक्रार नसताना ३१५ ते ३२५ मते फेरबदल करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये नेली, असा आरोप काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं, शेतकरी संघटनांनी केला. याप्रकरणी मुख्याधिका-यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी मंगळवारी नगरसेवक नंदू पवार यांनी फलटण पालिकेत झोपून आंदोलन केले. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते. फलटण पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते समशेर बहाद्दर नाईक-निंबाळकर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले.
याबाबत माहिती अशी की, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर सर्व उमेदवार व नागरिकांना पेन ड्राईव्ह तसेच छापलेल्या स्वरूपामध्ये विक्री केली. उमेदवारांनी वेळ कमी असल्याने आपली नावे मतदार यादीत किंवा आपल्या प्रभागामध्ये आहेत का? याची खात्री केली असता, अनेक नावे बदलली असल्याचे निदर्शनास आले. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केले. काही उमेदवारांना फायदा होण्यासाठी नियम धाब्यावर बसवून तीनमधील मतदारांची नावे प्रभाग पाचमध्ये वर्ग केल्याने संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.