एसटीच्या ताफ्यात येणार ‘परिवर्तन’, लाल डब्याची ओळख पुसणार

By admin | Published: May 12, 2017 03:30 AM2017-05-12T03:30:47+5:302017-05-12T03:30:47+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा

The 'change' that will come under the sting of ST, will remove the identity of the red box | एसटीच्या ताफ्यात येणार ‘परिवर्तन’, लाल डब्याची ओळख पुसणार

एसटीच्या ताफ्यात येणार ‘परिवर्तन’, लाल डब्याची ओळख पुसणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस आहेत. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत स्टीलच्या बांधणीत तयार झालेली बस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे.
‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाईल. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्या तरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत होते. म्हणून पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलच्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत.
या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी बसवण्यात आले आहे.

अशी असणार नवीन बस- बस धावत असताना हवेचा रोध कमी करण्यासाठी एरोडायनामिक डिझाइन
एलईडीमध्ये गाडीचे मार्गफलक -प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ उद्घोषणा यंत्रणा, हवा खेळती राहण्यासाठी छतावर तीन रुफ हॅचची व्यवस्था.

Web Title: The 'change' that will come under the sting of ST, will remove the identity of the red box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.