दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली

By admin | Published: October 17, 2014 02:00 AM2014-10-17T02:00:02+5:302014-10-17T02:00:02+5:30

दीक्षाभूमीवर होणा:या ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ कार्यक्रमाचा मराठी बातम्यांमध्ये समावेश न केल्याने त्यांची शिलाँगला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Changed the program due to the program | दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली

दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली

Next
मुंबई : मुंबई दूरदर्शनच्या वृत्तविभागातील उपसंचालक चिन्मय चक्रवर्ती यांनी दस:याच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमीवर होणा:या ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ कार्यक्रमाचा मराठी बातम्यांमध्ये समावेश न केल्याने त्यांची शिलाँगला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे राष्ट्रीय प्रसारण केले होते. मात्र दीक्षाभूमीचा कार्यक्रम टाळण्यात आला होता.
दस:याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी दलित बांधव जमा होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत लक्षावधी लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 
यंदा मराठी बातम्यांमध्ये या कार्यक्रमाचा समावेश केला गेला नाही. उपसंचालक या नात्याने चिन्मय चक्रवर्ती यांची ही जबाबदारी होती. त्याच दिवशी सकाळी मोहन भागवत यांचे भाषण राष्ट्रीय प्रसारणात दाखवण्यात आले. यावरून देशभर काहूर उठले. सरकारवर टीका
झाली. त्याचवेळी नागपूरचा दीक्षाभूमीवरील कार्यक्रम टाळला गेल्याने केंद्रातील भाजपा सरकारवर पक्षपाती असल्याचा आरोप होऊ लागला. तशा तक्रारी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केल्या गेल्या. विदर्भात काँग्रेसवर राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात भाजपा असताना दीक्षाभूमीची घटना टाळण्याचे राजकीय परिणाम होतील, अशी भीती भाजपाला वाटत होती. त्यामुळे अखेरीस चक्रवर्ती यांची शिलाँगला बदली झाली. आता त्यांच्या जागेवर उपसंचालकपदी दिल्लीहून सिद्धार्थ बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आपण कसेही वर्तन केले तरी आपल्यावर कुठलीही कारवाई 
होणार नाही, अशी धारणा वृत्त विभागातील काही अमराठी अधिका:यांची होती. चक्रवर्ती यांच्यावरील कारवाईने हा गैरसमज दूर झाल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Changed the program due to the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.