जिल्ह्याच्या दळणवळणात आमूलाग्र बदल शक्य
By admin | Published: June 6, 2017 02:37 AM2017-06-06T02:37:59+5:302017-06-06T02:37:59+5:30
विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : सावित्री नदी पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या विविध विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्हा पॅकेजअंतर्गत, २४७.१३ कोटी रुपये खर्चाचा महाड जंक्शन (रा.म.६६ वरील कि.मी.१२३/४००), ते रायगड किल्ला (जिजामाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत)चा दुपदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता. रस्त्याची एकूण लांबी २५.६०९ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये :- काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १९ लहान पूल, १४० मोऱ्या. ४२१.०२ कोटी रुपये खर्चून आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी (रा.म.क्र. ६६ जंक्शन)चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता बांधणी. रस्त्याची एकूण लांबी ५९.६६७ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये - काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १७ लहान पूल, ३२४ मोऱ्या आणि रेल्वे खालील एक पूल. वरील रस्ते विकासामुळे दळणवळण सुकर होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरण (तीन पॅकेजेस)
इंदापूर (कि.मी. ८४/००) ते वडपाले (कि.मी. १०८/४००) या टप्प्याच्या चौपदरीकरणाकरिता चेतक एटंरप्रायजेस, जयपूर या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १२०२.५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी २६.७५ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये -फोरलेन काँक्र ीट रस्ता पेव्हड शोल्डरसह, इंदापूर व माणगाव शहरास बायपास, एक उड्डाणपूल, रेल्वेवरील तीन पूल, एक मोठा पूल, ९ लहान पूल, ८ बसथांबे, एक ट्रक थांबा यांचा समावेश आहे.
वीर (कि.मी. १०८/४००) ते भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) या रस्त्याच्या चौपदरीकरणाकरिता एल अॅण्ड टी कंपनी, मुंबई या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १५९८.४७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी ३८.७६ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये - काँक्र ीट रस्ता फोर लेन पेव्हड शोल्डरसह, एक उड्डाणपूल, दोन मोठे पूल, नऊ लहान पूल, वाहनांसाठी १८ ओव्हर/अंडर पास रोड, तीन पादचारी पूल यांचा समावेश राहणार आहे.
भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) ते कशेडी घाट (कि.मी. १६१/६००)दरम्यान १.७२ कि.मी.चे दोन बोगदे व ९ कि.मी. जोडरस्ता, यांचा समावेश असून याकामी १०११.८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रस्त्याची एकूण लांबी ९ कि.मी. दोन बोगद्यांची प्रत्येकी लांबी १.७२० कि.मी., पोचमार्गाची लांबी ७.२८ कि.मी. दरीवरील पुलाची लांबी ६८० मी., नदीवरील पुलाची लांबी ४६६ मी. राहणार आहे.
केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजूर विकासकामे
अलिबाग-रेवदंडा रस्ता (प्रा.रा.मा. ४ कि.मी. 00/00 ते १४/१००)चे १० कोटी खर्चून काँक्रि टीकरण करणे, शिरवली माणकुले रस्त्याची १० कोटी खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील वाकण-पाली-खोपोली (रा.मा. ९३), रस्त्याची ४.५ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभरघर-महागाव-हातोंड-गोंदाव (रा.मा.९३ प्र.जी ता.४०), रस्त्याची ४ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे. दिघी-नानावटी-साव-आडगाव-वेळास रस्त्याचे ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून रुंदीकरण व सुधारणा करणे, या कामांचा समावेश आहे.