जययुक्त शिवारमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन -सुरेश धुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:42 AM2018-01-05T04:42:18+5:302018-01-05T04:43:41+5:30

 शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच तीन वर्षात राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली़ या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत.

Changes in the lives of ordinary people due to jayant shivar - Suras Pivot | जययुक्त शिवारमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन -सुरेश धुरी

जययुक्त शिवारमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन -सुरेश धुरी

Next

  मुंबई -  शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच तीन वर्षात राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली़ या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे़ या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति, संस्था, अधिकारी व पत्रकारांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरित करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्य मंत्री विजय शिवतारे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या लोगोचे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोगो तयार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या किशोर गायकवाड याचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
निसर्गावर, पावसावर अवलंबून राहलो तर शेतीचा शाश्वत विकास होऊ शकणार नाही. राज्यातील सर्व धरणे भरली तरीही ५० टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. जलयुक्त योजना राबविताना जिल्हाधिका-यांच्या अधिकाराखाली या सर्व योजना एकत्र केल्या. यामुळे पहिल्याच वर्षी जलयुक्त योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकसहभाग व प्रशासन हेच या योजनेचे खरे शिल्पकार आहेत. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढणार असून अधिक वेगाने काम करायचे आहे. टाटा ट्रस्टने दिलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक अचूक कामे करण्यात येतील. पुढील काळात याच पद्धतीने कामे केली तर दुष्काळ हा भूतकाळ असेल आणि कमी पावसातही राज्यातील शेतकरी शाश्वत शेती करू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुरस्कार विजेते
 

Web Title: Changes in the lives of ordinary people due to jayant shivar - Suras Pivot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.