राज्यातील १९ जिल्हा उपनिबंधकांच्या झाल्या बदल्या

By Admin | Published: June 3, 2017 07:14 PM2017-06-03T19:14:16+5:302017-06-03T19:14:16+5:30

-

Changes made to the 19 District Dy | राज्यातील १९ जिल्हा उपनिबंधकांच्या झाल्या बदल्या

राज्यातील १९ जिल्हा उपनिबंधकांच्या झाल्या बदल्या

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यातील उपनिबंधक सहकारी संस्था, गट अ संवर्गातील १९ अधिकाऱ्यांच्या विनंती व मुदतपूर्व बदल्या शासनाने शनिवारी सहकार व पणन विभागाने जाहीर केल्या़
भंडाराचे जिल्हा उपनिबंधक एस़ एऩ क्षीरसागर यांची उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर येथे बदली, पुण्याचे विभागीय उपनिबंधक ए़एम़देशमुख यांची जिल्हा उपनिबंधक सोलापूर येथे बदली, जालनाचे जे़बीग़ुट्टे यांची औरंगाबाद येथे विभागीय उपनिबंधक पदावर बदली, नाशिकच्या उपनिबंधक मीना वि़ आहेर यांची विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग येथे बदली, अमरावतीचे किरण गायकवाड यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असो, पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, नागपूर विभागातील सचिन घोडके यांची जी़ एऩ मुंबई विभाग येथे बदली, कोल्हापूर शहर उपनिबंधक सं़ वि़ निकम यांची आऱ विभाग मुंबई येथे बदली, उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथील पी़ एस़ सोनवणे यांची मुंबई २ येथे जिल्हा उपनिबंधक या पदावर बदली, बुलढाणा येथील डी़ एम़ पालोदकर यांची जालना, नागपूर येथील प्रादेशिक संचालक, वस्त्रोउद्योग येथील नानासाहेब चव्हाण यांची बुलढाणा, पुणे येथील कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणुक प्रकल्प उपसंचालक एस़ यु़ शिरापूरकर यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे बदली, पुणे येथील विभागीय उपनिबंधक प्रशांत सुर्यवंशी यांची पुणे शहर १ येथे उपनिबंधक पदावर बदली, तळेगांव दाभाडे येथील उपनिबंधक एस़ एम़ तांबे यांची पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, पुणे शहर १ चे उपनिबंधक अमोल यादव यांची उपसंचालक (अभियांत्रिकी) कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक प्रकल्प, पुणे येथे बदली, नागपूर शहर २ चे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे बदली, यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांची उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नागपूर विभाग येथे बदली़
याशिवाय पुणे येथील उपनिबंधक पी़ एम़ बर्गे यांची उस्मानाबाद येथे तर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांची यवतमाळ येथे जिल्हा उपनिबंधक पदावर बदली करण्यात आली आहे़

Web Title: Changes made to the 19 District Dy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.