महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल

By admin | Published: December 10, 2015 02:49 AM2015-12-10T02:49:41+5:302015-12-10T02:49:41+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला

Changes in Maharashtra Public Service Commission Examination | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल

Next

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सदर निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर २० जून २०१५ रोजी घोषणा प्रसिद्ध करून या निर्णयाबाबत उमेदवारांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.या संदर्भात लोकप्रतिनिधींचे निवेदन प्राप्त झाले आहे. आयोगाच्या सदर घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त सूचना विचारात घेऊ न याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडे विचारविनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in Maharashtra Public Service Commission Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.