नाशिकला परिवर्तन

By admin | Published: February 24, 2017 04:43 AM2017-02-24T04:43:36+5:302017-02-24T04:43:36+5:30

गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसला जबरदस्त धोबीपछाड देत शिवसेनेने

Changes to Nashik | नाशिकला परिवर्तन

नाशिकला परिवर्तन

Next

नाशिक : गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसला जबरदस्त धोबीपछाड देत शिवसेनेने जिल्हा परिषदेत जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक २५ जागा मिळविल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेस १९ जागा मिळवून दुसऱ्या स्थानी राहिली आहे. सत्तेसाठी शिवसेना भाजपाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.
जिल्ह्यातील पूर्व भागातून सिन्नर, नांदगाव, येवला तसेच दिंडोरी, निफाड, इगतपुरी तालुक्यांतून सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या असून, गेल्यावेळी २७ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ८ जागा, तर कॉँग्रेसच्या ७ जागा कमी झाल्या आहेत. मनसेचा जिल्ह्यात पूर्णत: सफाया झाला आहे. गेल्यावेळी त्यांना दोन जागा मिळालेल्या होत्या. माकपाने मात्र तीन जागांचा आकडा कायम राखला आहे.
दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागणार असून शिवसेनेला भाजपाची मदत घेतल्यास दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याची संधी आहे.
खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य तसेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर चव्हाण यांच्यासह आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल गावित व आमदार जिवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेने भाजपाशी युती केल्यास पूर्ण बहुमताने जिल्हा परिषदेवर भगवा फडकू शकेल. (प्रतिनिधी)


नाशिक

पक्षजागा
भाजपा१५
शिवसेना२५
काँग्रेस०७
राष्ट्रवादी१९
इतर०७

Web Title: Changes to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.