तिसरी,चौथीच्या अभ्यासक्रमात बदल : एकाच पुस्तकात चार विषयांचा समावेश

By admin | Published: July 1, 2014 10:08 PM2014-07-01T22:08:05+5:302014-07-02T00:32:54+5:30

वेगवेगळ्या विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यात आल्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझेदेखील कमी झाले आहे.

Changes in the third, fourth syllabus: The four subjects include in the same book | तिसरी,चौथीच्या अभ्यासक्रमात बदल : एकाच पुस्तकात चार विषयांचा समावेश

तिसरी,चौथीच्या अभ्यासक्रमात बदल : एकाच पुस्तकात चार विषयांचा समावेश

Next

वाशिम: बालकांचा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तिसरी व चवथीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.वेगवेगळ्या विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यात आल्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझेदेखील कमी झाले आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी या मोफत पाठ?पुस्तकांचे वितरण शाळेत करण्यात आले. तसेच बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पाठय़पुस्तकांतील धडे कमी करण्यासाठी यंदा तिसरी व चवथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. अनेक विषय एकाच पुस्तकात गुंफन करण्यात आली आहे. या विषयांचे धागे एकमेकांशी निगडित आहे. विद्यार्थी जे काही शिकत आहे ते नेमके काय आहे याचे आकलन विद्यार्थ्यांना होणार आहे.एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होऊन सांगा पाहू?, करून पहा?, जरा डोके चालवा?या शीर्षकाखाली कृतीची जोडही राहणार आहे.त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात रमायला नक्कीच मदत होईल, असा पाठय़पुस्तक मंडळाचा हेतू आहे.
नवीन पुस्तकांच्या दुनियेत चिमुकले रममान झाले असले तरी हा विषय शिकविण्यासाठी गुरुजींना मात्र पुढील आठवड्यात प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित होत असते. इयत्ता चवथीत विद्याथ्यार्ला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये विकसित करता यावे यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचण्यासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे.
यामध्ये मुलांचे भावविश्‍व, अनुभव व प्रसंग याचा विचार करण्यात आला आहे. गाभाघटक, मुल्ये व जीवनकौशल्ये याचा अंतर्भाव पाठात राहणार आहे

** डोके चालवायला होणार मदत
यावर्षी ईयत्ता चवथीला विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय आहेत. मात्र त्याची स्वतंत्र पुस्तके नाहीत. या विषयाचा समावेश परिसर अभ्यासक्रम या विषयामध्ये करण्यात आला आहे. हे विषय स्वतंत्र ठेवलेले नाहीत. त्यांची एकमेकांशी गुंफन करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थी जे शिकतो याचे आकलन व डोके चालवायला या बदलत्या अभ्यासक्रमाची मदत होईल.

** भाषा,गणितातूनही मिळणार पर्यावरणाचे धडे
पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी शासन सातत्याने अग्रेसर आहे. तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमात भाषा आणि गणितासारख्या अभ्यासक्रमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. या पाठ?पुस्तकामध्ये फळे, फुले, भाज्या, शेती, पाणी, बियाणे, बागेतील झाडे, बागेत खेळणारी मुले याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जवळीक दिली आहे. जांभूळ चिंचोके यासह विविध फळांच्या बिया, फुले, याचा वापर करण्यात आला आहे. मराठीच्या पुस्तकामध्ये झाडे, पशू, पक्षी यांच्यासह प्रेम करणे, काळजी घेणे, वस्तूचा पूर्ण वापर करणे, कचर्?याचे व्यवस्थापन यावर पाठ आहेत. विद्यार्थ्यांनी पर्यावरणप्रेमी मंडळ तयार करावीत. घोषवाक्ये लिहावीत असे रंजक उपक्रम यात अंतभरूत आहे. पाणी ही निसगार्ची संपत्ती, निसर्गावर प्रेम ठेवण्यास भर देण्यात आला आहे.

** बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना प्रशिक्षण
या शैक्षणिक सत्रापासून तिसरी व चवथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यासाठी राज्यातील सुमारे २ लाख शिक्षकांना या बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षकासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. ज्ञानरचनावाद, सातत्यपूर्व, सवर्ंकष मूल्यमापन, अध्ययन अनुभवाची रचना, आंतरक्रिया कृतीवर भर देणारा हा अभ्यासक्रम असल्याने वर्गात त्याची अंमलबजावणी कसी करावी, याची वैशिष्ट्ये मांडणी करणारे हे प्रशिक्षण असणार आहे, प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षणाधिकार्‍यांना एका दिवसाचे, सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. आता शिक्षकांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तिसर्‍या वर्गाकरिता मराठी व ईतर माध्यमांचे शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहे व एवढेच चवथीच्या अभ्यासक्रमासाठी राहणार आहे. यानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षण होणार आहे.तालुक्यातील शिक्षक सहभागी होणार असल्याचे राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेतर्फे सांगण्यात आले.

** चिमुकल्यांना मिळणार विक्रमवीर सचिनचे धडे
जगातील सर्वच मैदानावर क्रिकेटविश्?वातील विक्रम मोडीत काढणार्‍या, सलग १0 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या १0 क्रमवारीत राहणार्‍या, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कारप्राप्त सचिन तेंडूलकरचे धडे यावर्षीच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात देण्यात आले आहे. भारतीय क्रीडा रसिकांचे अपेक्षापूर्ती करणार्?या या वंडरबॉय व मास्टर ब्लॉस्टरचे धडे विद्यार्थीगिरविणार आहे.त्याची विनम्र वागणूक, शालीनता, शालेय जीवनातही त्याची मेहनत, खडतर परिश्रम, रचलेले धावांचे डोंगर, त्याच्याजवळ असणारा संयम, एकाग्रता या सर्व गोष्टी या धड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गिरवाव्यात, असा पाठ?पुस्तक मंडळाचा मानस आहे. सचिनच्या २४ वर्षांच्या कारकिदीर्चा आढावा कोलाजच्या माध्यमातून या पाठ?पुस्तकात घेण्यात आला आहे.यापूर्वी सीबीएसई दहावीच्या अभ्यासक्रमात सचिन तेंडूलकरच्या धड्याचा समावेश करण्यात आला होता
 

Web Title: Changes in the third, fourth syllabus: The four subjects include in the same book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.