एफआरपी बेस बदलल्याने १६०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:40 AM2018-10-15T06:40:09+5:302018-10-15T06:40:33+5:30

राजू शेट्टी; याचिका दाखल करणार

Changing the FRP base costs Rs 1600 crores | एफआरपी बेस बदलल्याने १६०० कोटींचे नुकसान

एफआरपी बेस बदलल्याने १६०० कोटींचे नुकसान

Next

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.


इचलकरंजी येथे भाजपा सरकारच्या कारभाराचा पंचनामा विषयावर सभा झाली. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही, अशी टीका केंद्र व राज्य सरकारमधील भाजपा नेते करत आहेत. मात्र ,रिकव्हरीचा बेस अर्ध्या टक्क्याने वाढविल्याने शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे. फसव्या आकडेवारीचा हिशेब पटवून द्यावा; अन्यथा अर्धा टक्के रिकव्हरीचा बेस पूर्ववत करावा.

चंद्रकात पाटील यांनीच लढावे

शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

Web Title: Changing the FRP base costs Rs 1600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.