अनुक्रमांक बदलल्याने भुसावळला खर्च वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 04:52 AM2016-11-14T04:52:26+5:302016-11-14T04:52:26+5:30
नगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण तापले असतानाच, शनिवारी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये १३ उमेदवारांचे अनुक्रमांक
भुसावळ (जि.जळगाव) : नगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण तापले असतानाच, शनिवारी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये १३ उमेदवारांचे अनुक्रमांक बदलले. त्यामुळे उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दुपारीच देण्यात आलेल्या अनुक्रमांकानुसार, बॅनर्स तयार करण्यात आल्याने उमेदवारांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला़ माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर, शनिवारी तहसील कार्यालयात त्या-त्या प्रभागातील इच्छुकांची यादी प्रसिद्ध करण्यात
आली, तर दुपारी संबंधित उमेदवारांना अनुक्रमांक देण्यात आले. यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी बॅनर, हँडबिल आदी साहित्याची छपाई केली. मात्र, सायंकाळी अचानक निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदासाठीच्या तीन उमेदवारांचे अनुक्रमांक बदलले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतपत्रिकांचे अनुक्रमांक देण्यात आले आहेत.सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर याद्या लावण्यात आल्या, असे तहसीलदार मीनाक्षी राठोड-चव्हाण यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)