कणकवलीत राणेंनी भाजपाला केले चीतपट, वैजापुरात अध्यक्ष भाजपाचा, बहुमत सेनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 06:14 AM2018-04-13T06:14:43+5:302018-04-13T06:14:43+5:30

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगर पंचायतीचे अध्यक्षपद आणि बहुमतही खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने जिंकले.

Chanpatap to BJP in Kankavli, president of BJP in Vaizapur, majority of Sena | कणकवलीत राणेंनी भाजपाला केले चीतपट, वैजापुरात अध्यक्ष भाजपाचा, बहुमत सेनेला

कणकवलीत राणेंनी भाजपाला केले चीतपट, वैजापुरात अध्यक्ष भाजपाचा, बहुमत सेनेला

Next

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगर पंचायतीचे अध्यक्षपद आणि बहुमतही खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने जिंकले. भाजपाचे खासदार असलेल्या राणेंनी भाजपा-शिवसेना युतीचाच पराभव केला. तर जामनेरमध्ये (जि. जळगाव) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन मताधिक्याने विजयी झाल्या. कणकवली नगराध्यक्षपदासाठी स्वाभिमानचे समीर नलावडे यांनी
भाजपाचे संदेश पारकर यांचा ३७ मतांनी पराभव केला. स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीने १७ पैकी ११ जागा जिंकल्या. भाजपा, शिवसेनेला प्रत्येकी
तीन जागा मिळाल्या. स्वतंत्रपणे लढणाऱ्या काँग्रेसला आपले खाते उघडता आलेले नाही. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एकहाती सत्ता संपादन करीत आपला गड कायम राखला आहे. त्यांच्या पत्नी व विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रा. अंजली पवार यांचा तब्बल ८ हजार ३५३ मतांनी पराभव केला. भाजपाचे सर्वच्या सर्व २४ नगरसेवक निवडून आले.
> वैजापूरमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष
वैजापूर (जि. औरंगाबाद) : येथील नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी यांनी शिवसेनेच्या उमेदवार सय्यद ताशफा अजहर अली यांचा २०७३ मतांनी पराभव करत सत्ता ‘कमळ’ फुलविले. मात्र शिवसेनेचे सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आल्याने उत्साहावर पाणी फेरले.
आजच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भाजपा ५०
शिवसेना २३
राष्ट्रवादी 0९
काँग्रेस 0६

Web Title: Chanpatap to BJP in Kankavli, president of BJP in Vaizapur, majority of Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.