फेरीवाला पुनर्वसनाचा पुणो पॅटर्न राज्यभर?

By admin | Published: June 30, 2014 02:09 AM2014-06-30T02:09:25+5:302014-06-30T02:09:25+5:30

फेरीवाल्यांसंदर्भात पुणो महापालिकेने राबविलेला पॅटर्न राज्यभर राबविला जाण्याची शक्यता आहे.

Chaparwala rehabilitation reform pattern in the state? | फेरीवाला पुनर्वसनाचा पुणो पॅटर्न राज्यभर?

फेरीवाला पुनर्वसनाचा पुणो पॅटर्न राज्यभर?

Next
>पुणो : फेरीवाल्यांसंदर्भात पुणो महापालिकेने राबविलेला पॅटर्न राज्यभर राबविला जाण्याची शक्यता आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या महापालिकेने  राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण महापालिकेचे अधिकारी मुंबईत नगरविकास विभागात सोमवारी राज्यभरातील महापालिका आयुक्तांसमोर करणार आहेत. 
देशभरातील महापालिकांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2क्क्9 ची चार महिन्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2क्13 मध्ये केंद्र सरकारला दिले होते. तसेच पुढील त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार, राज्यातील सर्व महापालिकांनी ही अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, मुंबई महापालिकेकडून याबाबत दिरंगाई होत असल्याची एक याचिका दाखल केली होती.
त्यानुसार, पालिकांकडून राबविल्या जाणा:या या धोरणाच्या अंमलबजावणीसंबंधीची माहिती घेण्यासाठी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव श्रीकांत सिंह यांनी मागील आठवडय़ात मुंबईत एक बैठक बोलाविली होती. ही बैठक काही कारणास्तव रद्द झाल्यानंतर पालिका अधिका:यांनी स्वत: सिंह यांची भेट घेऊन पालिकेच्या अंमलबजावणीची माहिती दिली. पुणो महापालिकेने केलेली अंमलबजावणी योग्य असून इतर महापालिकांनाही त्याचे सादरीकरण करावे, अशा सूचना सिंह यांनी त्या वेळी पालिका अधिका:यांना केली. त्यानुसार, सोमवारी मुंबईत विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील महापालिका आयुक्त उपस्थित राहणार असून पुणो पालिकेचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
 
दुस:या टप्प्यात शहरातील फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण, त्याच ठिकाणी त्यांची क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र यंत्रणा नेमून बायोमेट्रिक्स नोंदणी, त्यांच्यासाठी जागा निश्चिती आणि त्यांचे ओळखपत्र तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम जवळपास 9क् टक्के पूर्ण झाले आहे.
 

Web Title: Chaparwala rehabilitation reform pattern in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.