नक्षलग्रस्त भागात निम्म्या पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर

By admin | Published: August 4, 2015 01:08 AM2015-08-04T01:08:12+5:302015-08-04T01:08:12+5:30

जिल्ह्यातील एकूण १५ पोलीस ठाण्यांपैकी आठ पोलीस ठाण्यांचा कारभार मागील काही दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

In charge of charge of half the police stations in Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागात निम्म्या पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर

नक्षलग्रस्त भागात निम्म्या पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर

Next

दिगांबर जवादे, गडचिरोली
जिल्ह्यातील एकूण १५ पोलीस ठाण्यांपैकी आठ पोलीस ठाण्यांचा कारभार मागील काही दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविताना अडचणी येत आहेत.
गडचिरोली पोलीस दलात जवळपास सात हजार पोलीस असून, हे सर्व १५ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत काम करीत आहेत. येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच नक्षलविरोधी मोहिमेची आखणी करावी लागते. प्रत्यक्ष जंगलात जाऊन नक्षलविरोधी अभियानसुद्धा राबवावे लागते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथील पोलीस विभागावर कामाचा मोठा ताण आहे. कामाची जबाबदारी लक्षात घेता, पोलीस ठाण्यांच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक दर्जाचा अनुभवी पोलीस अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पुराडा, कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, जारावंडी, भामरागड व आसरअल्ली या पोलीस ठाण्यांचा कारभार अनेक दिवसांपासून प्रभारींवरच चालविला जात आहे. काही पोलीस ठाण्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक तर काही ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या नवख्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: In charge of charge of half the police stations in Naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.