नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी हा आरोप चुकीचा - मुख्यमंत्री

By admin | Published: December 23, 2015 04:39 PM2015-12-23T16:39:20+5:302015-12-23T16:39:20+5:30

नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली असून नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

The charge of the crime capital of Nagpur is wrong - Chief Minister | नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी हा आरोप चुकीचा - मुख्यमंत्री

नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी हा आरोप चुकीचा - मुख्यमंत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ -  नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली असून नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. 
नागपूरात सुरु असलेल्या हिवाऴी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की,  खून, दरोडा, दंगा, जबरी चोरी अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक घट झाली आहे. सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई नागपुरात करण्यात आली आहे, त्यामुळे नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी  आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही मुद्दे :- 
-  गुन्हेगारांना शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी पार्टटाईम नव्हे फुलटाईम गृहमंत्री .
- पोलिस दलात १२,०४३ नवीन पदे लवकरच भरणार. 
- राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी २४ तास उपलब्ध आहेत .
- राज्य सरकारने केलेल्या उपायांमुळेच अनेक शहरांमध्ये १०० ते १३० रूपये प्रतिकिलो दरम्यान डाळ उपलब्ध झाली.
- संपूर्ण पुणे सीसीटीव्हीच्या निगराणीत आले, मुंबईमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला.
- सीसीटीएनएस : प्रत्येक पोलिस ठाण्यात एफआयआर ऑनलाईन, १ जानेवारीपासून आकस्मिक तपासणी करणार.
- मुंबईतील दामुनगरातील आगग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रूपये मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. तसेच, त्यांच्या पुनर्वसनासंबंधी दोन महिन्यात ठोस निर्णय घेण्यात येईल.
- रमाई आवास व शबरी आदिवासी घरकुल योजनेत ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्त्व असलेल्या आणि ग्रामीण बेघर व्यक्तींचा समावेश करणार.
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी श्री सिद्धीविनायक शिष्यवृत्ती योजना.
- सर्वाधिक ५१ नक्षलवादी गेल्या वर्षभरात शरण आले, ही संख्या गेल्या ५ वर्षांतील सर्वाधिक आहे. 

Web Title: The charge of the crime capital of Nagpur is wrong - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.