मौलानासह तिघांवर आरोपपत्र

By admin | Published: January 21, 2016 04:02 AM2016-01-21T04:02:35+5:302016-01-21T04:02:35+5:30

भारताबाहेरील दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक कट्टरवाद पसरविण्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले

The chargesheet on the three accused including Maulana | मौलानासह तिघांवर आरोपपत्र

मौलानासह तिघांवर आरोपपत्र

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
भारताबाहेरील दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक कट्टरवाद पसरविण्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा व दंडसंहितेखालील विविध गुन्ह्यांखालील हे आरोपपत्र आहे.
सुरुवातीस हल्ल्याची साधी व एकाकी घटना मानून स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला होता. मात्र वरकरणी साधी वाटणारी ही घटना धार्मिक कट्टरवादाने स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याच्या पद्धतशीर योजनेतून घडली होती, हे एटीएसने केलेल्या तपासातून उघड झाले. या संपूर्ण घटनाक्रमाचे संगतवार वृत्तांकन सर्वप्रथम लोकमतने केले होते.
अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक (२०, रा. पुसद, जिल्हा यवतमाळ) याने २५ सप्टेंबर २०१५ रोजी तीन पोलीस शिपायांवर हल्ला केला होता. मलिकवर तेव्हा भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. परंतु याच हल्ल्याच्या एटीएसने केलेल्या समांतर चौकशीत मलिकने गोहत्या बंदीनंतर हा हल्ला केल्याचे समोर आले. अब्दुल मलिकला दहशतवादी कारवायांसाठी मौलाना सलीम मलिक उर्फ रहमान उर्फ मेहबूब शेख (२६) याने मूलतत्त्ववादी बनविल्याचेही स्पष्ट झाले.
भारतीय मुस्लिमांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल सलीम मला सांगायचा. आणि मी (मौलाना सलीम) जर तुला ‘कुठेतरी’ पाठविले तर तुझे पालक तू बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे करणार नाहीत अशी खात्री त्याला माझ्याकडून हवी होती, असेही अब्दुल मलिकने त्यात सांगितले होते.
याशिवाय मलिक हिंगोलीचा शोएब खान उर्फ अहमद उर्फ रेहमान खान (२५) याच्या संपर्कात होता, असेही आढळले. या शोएब खानला हैदराबाद पोलिसांनी गेल्या वर्षी तो दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली होती. मलिक आणि सलीम यांच्याशी संबंध असल्याचे आढळल्यानंतर शोएब खानला एटीएसने त्यांच्या प्रकरणात अटक केली.
आम्ही सोमवारी ७६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यासोबत आम्ही १२३ साक्षीदारांचे जबाबही जोडले आहेत. शोएब खान हा त्याला परदेशात राहून हाताळणाऱ्यांच्या (हँडलर्स) संपर्कात होता असे आम्हाला आढळले. त्याने आधी मी एकटाच प्रवास करीन व तेथे सगळी व्यवस्था केल्यानंतर माझ्यासोबतीसाठी दोघांना बोलावून घेईन, असेही त्याने आम्हाला सांगितल्याचे वरिष्ठ एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या आरोपपत्रासोबत दहशतवादाशी संबंधित व्हिडीओज, मजकूर आदी तांत्रिक पुरावेही जोडण्यात आले आहेत. हे पुरावे आम्ही आरोपींच्या मोबाइल हँडसेट्समधून मिळविले आहेत. या तीन आरोपींवर एटीएसने भारतीय दंड संहितेचे कलम ३०७, ३३२, ३३३, १५३, ३५३, १८६, १०९, १२० (बी), शस्त्रास्त्र कायद्याचे कलम ४ आणि २५ आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचे (यूएपीए) कलम १६ आणि १८ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

Web Title: The chargesheet on the three accused including Maulana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.