धर्मादाय आयुक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:40 PM2021-08-26T18:40:03+5:302021-08-26T18:40:39+5:30

पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेण्याचं राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना करण्यात आलं होतं आवाहन.

Charity Commissioner cherishes social commitment maharashtra konkan | धर्मादाय आयुक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी !

धर्मादाय आयुक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी !

googlenewsNext
ठळक मुद्देपूरग्रस्तांसाठी पुढाकार घेण्याचं राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना करण्यात आलं होतं आवाहन.

महाराष्ट्रातीलरत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड व इतर जिल्ह्यांमधे आलेल्या महापुरामुळे तसेच दरड कोसळल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आणि अनेक कुटुंब बेघर झाली. पुरग्रस्थांचे अतोनात नुकसान झालेले आहे, शासन आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करत आहे. पण धर्मादाय आयुक्त  प्र. श्रा. तरारे यांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना या कामी मदत करण्याचे आवाहन केले होते.

सदर आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून रुपये एक कोटी पेक्षा जास्तीची मदत जमा केली आहे त्याचाच एक भाग म्हणून रुपये तेहतीस लाख साठ हजारांचा  धनादेश आज  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खर्गे यांना धर्मादाय आयुक्त प्र. श्रा .तटारे  यांनी सुपूर्द  केला.

धर्मादाय आयुक्त विभागाच्या बांधिलकीची सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. एका शासकीय विभागातून पुरग्रस्थांसाठी दाखवलेल्या संवेदनशीलतेसाठी सादर विभाग नक्कीच कौतुकास पात्र आहे. येत्या काळात असेच स्तृत्य उपक्रम करण्याचा मानस  प्र. श्रा. तरारे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

Web Title: Charity Commissioner cherishes social commitment maharashtra konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.