चिमुकलीवर नराधमाचा बलात्कार, आरोपीस अटक
By admin | Published: August 23, 2016 08:00 PM2016-08-23T20:00:06+5:302016-08-23T20:00:06+5:30
शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी आलेल्या पंजाबमधील एका कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरनराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २३ : शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी आलेल्या पंजाबमधील एका कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरनराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
बार्शी रोडवरील केंद्रीव राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एका कामाचा पंजाबच्या ठेकेदाराने ठेका घेतला असून, या कामासाठी मजूर म्हणून त्यांनी पंजाबमधील कुटुंबाला लातुरात आणले. या मजूरदारांमध्ये नराधम श्रवण वल्द दलविंदर सिंग (वय २७, रा. अमृतसर, पंजाब) याचाही समावेश आहे. १४ आॅगस्ट रोजी त्या चिमुकलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर पडले. यावेळी घरात खेळणाऱ्या चिमुकलीवर कोणीच नसल्याची संधी साधून श्रवण वल्द दलविंदर सिंग या नराधमाने बलात्कार केला. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती त्या चिमुकलेने आपल्या आई-वडिलांना सांगितली.
या चिमुकलीला आई-वडिलांनी उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. शेवटी सोमवारी रात्री या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोेलिसांनी प्रथम नराधमाच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात मंगळवारी पहाटे कलम ३७६, २ आयजे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,५,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.